Igatpuri | टाकेद शिष्टमंडळाने तहसीलदारांसमोर वाचला स्थानिक समस्यांचा पाढा


इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद गटातील जवळपास चाळीस वाड्या वस्त्या आणि वीस पंचवीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ नागरिकांचा रेशनकार्ड ऑनलाइन डाटा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिष्टमंडळ घेत इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांची गुरुवार (दि. १८) भेट घेत विविध प्रश्न मांडत निवेदन दिले.

दरम्यान यावेळी राम शिंदे यांनी इगतपुरी तालुक्यातील रेशनकार्ड संदर्भात तहसीलदार अभिजित बारावकर यांच्याकडे इगतपुरी तालुक्यातील शिधापत्रिका संदर्भात अनेक प्रश्न मांडले. यात जुने नवीन शिधापत्रिका, नाव कमी नाव समावेश, ऑनलाइन डाटा एन्ट्री, रेशनकार्ड ऑनलाइन करून शिधा चालू करणे, नवीन शिधापत्रिका, टाकेद गटातील कातकरी समाजातील रेशनकार्ड प्रश्न, केवळ इष्टांक उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून रेशनकार्ड ऑनलाइन करणे बाकी आहे.

Igatpuri | इगतपुरीत यंदा ३१ हजार हेक्टरवर होणार भात लागवड; मशागतीला वेग

यामुळे 12 अंकी RCID येत नाही त्यामुळे शासनाच्या लाडकी बहीण योजनेसह अन्य सर्व योजनांना लाभार्थ्यांना मोठ्या समस्या निर्माण होत आहे. जेष्ठ नागरिक विधवा महिला संजय गांधी निराधार योजना प्रलंबित प्रस्ताव प्रश्न तात्काळ सोडवा. यासह टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीतील रस्ता प्रश्न, परिसरातील शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न मांडले. यावेळी अडसरे बु. येथील माजी सरपंच जयराम साबळे यांनी अडसरे बु. येथील रेशनकार्ड प्रश्न मांडला.

नवनाथ निर्मळ यांनी टाकेद खुर्द येथील कातकरी बांधवांचा रेशनकार्ड प्रश्न मांडला. लवकरच या रेशनकार्ड संदर्भात टाकेद गटात अडसरे, टाकेद येथे रेशनकार्ड समस्या सोडवण्यासाठी इगतपुरी तहसील मार्फत शिबीर आयोजित करण्यात येईल. रेशनकार्डची सर्व समस्या आपण लवकरच दूर करू असे आश्वासन यावेळी तहसीलदार अभिजित बारावकर यांचेकडून देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, अडसरे बु. चे माजी सरपंच जयराम साबळे, टाकेद खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ निर्मळ, बाळू मुकणे, सचिन चोथवे, मेघशाम खामकर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु

“इष्टांक कोटा उपलब्ध करून लवकरच इगतपुरीतील ऑनलाइन रेशनकार्ड डाटा एन्ट्री प्रश्न सोडविण्यात येणार असून पूर्व भागातील टाकेद,अडसरे भागात शिधापत्रिका संदर्भात लवकरच शिबिराचे आयोजन करण्यात येईल या शिबिरात स्थानिक ठिकाणीच सर्व रेशनकार्ड प्रश्न सोडविले जातील.” – अभिजित बारावकर (तहसीलदार इगतपुरी)

“गेल्या वर्षभरापासून टाकेद परिसरातील ग्रामस्थांच्या ऑनलाइन डाटा एन्ट्री सह रेशनकार्डच्या विविध समस्या आहेत,अनेकवेळा तहसील कार्यालयात अर्ज देऊनही डाटा एन्ट्री होत नाही,यामुळे शेतकरी मजूर वर्ग काम धंदा सोडून अवाजवी पैसे खर्च करून रेशनकार्ड कामी तहसीलला येतात परंतु इष्टांक उपलब्ध नसल्याने त्यांची कामे होत नाहीत हि मोठी गैरसोय आहे ती दूर करण्यात यावी.” – राम शिंदे, (सामाजिक कार्यकर्ते टाकेद बु)

“टाकेद परिसरातील आदिम कातकरी समाज बांधवांसह सर्वांच्या रेशनकार्ड समस्या सोडविण्यात येणार असून टाकेद येथील शिबिरात आवश्यक कागदपत्रे तयार करून सर्वांनी आपल्या रेशनकार्ड समस्या सोडवून घ्याव्यात.” -नवनाथ निर्मळ (टाकेद खु.)

“अडसरे परिसरातील रेशनकार्ड संदर्भात तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असून लवकरच अडसरे येथे रेशनकार्ड शिबीर आयोजित केले जाणार आहे तरी या शिबिरात सर्व समस्या सोडविण्यात येणार आहे.”
– जयराम साबळे (माजी सरपंच अडसरे बु.)