Grapes Scheme | राज्यातील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष योजना आणली आहे.
Grapes Scheme | राज्यातील शेतकऱ्यांना सध्या आस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. आधी पावसाची दडी नंतर अवकाळीचा तडाखा यात शेती पिकांचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. यात अवकाळीमुळे प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे समोर ठेवून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता द्राक्ष आणि डळिंब यासारख्या फळपिकांसाठी काही विशेष योजना राज्य सरकार तयार करत असल्याची माहिती दिली आहे.(Grapes Scheme)
Grapes Export | ‘रुद्राक्ष’ नगरीतील ‘द्राक्ष’ संकंटात..!
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की, ‘‘ महायुतीच्या सरकारच्या गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसान भरपाईचे निकष बदलले यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. आमचे सरकार हे शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिलांचे सरकार आहे. मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्यांचे प्रश्न हे माहित आहे. मी स्वतःच्या घरात बसून इकडे उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. मी प्रसंगी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम करणारा शेतकरी आणि कार्यकर्ता आहे. यामुळे आता आपण पुढेही शेतकरी हिताच्या अनेक योजना आणणार असून, यात द्राक्ष आणि डळिंब या फळपिकांसाठी काही विशेष योजना आणणार आहोत.’’(Grapes Scheme)
काल शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड येथून शिवसेना शिंदे गटाच्या ‘शिवसंकल्प’ या अभियानाचा नारळ फुटला. या वेळी माजी मंत्री विजय शिवतरे, शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना आमदार शितल म्हात्रे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तसेच माजी आमदार शरद सोनवणे, आणि शिवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अबकी बार फिरसे मोदी सरकार
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढेही म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहे. दरम्यान, ही महासत्ता अधिक बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत. आणि याचसाठी आता ‘अब की बार ४०० पार’ असा नारा पंतप्रधान मोदींनी दिलेला असून, आपला संकल्प महाराष्ट्रातून ‘अब की बार ४५ पार’ असा आहे” आणि आपल्याला हा संकल्प पूर्ण करायचाच आहे.