Government Scheme | पीएम किसान योजनेत राज्यातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक निधी?


Government Scheme | भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून उदयाला आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ₹ 6,000 ची रक्कम वर्षभरात 3 हप्त्यांद्वारे दिली जाते.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील अगदी रुढी परंपरा, श्रद्धा आणि जीवनपद्धती ह्यादेखील शेतीवर आधारित आहेत. तसेच देशात जवळपास 55% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून देशातील शेतकऱ्यांना आस्मानी, दुष्काळ तसेच गारपीट अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागते. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा आतापर्यंत १४ वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अहमदनगर हा पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा सर्वाधिक निधी मिळविणारा जिल्हा ठरला असून नाशिक जिल्हा हा नवव्या क्रमांकावर आहे. अहमदनगर जिल्ह्याला या योजनेचा १,५७७.५४ कोटी निधी मिळाला असून नाशिक जिल्ह्याला १,१३९.६१ कोटी रुपये इतका निधी प्राप्त वितरीत झाला आहे.

Government Scheme | काय आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना?

  1. फेब्रुवारी २०१९ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती.
  2. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  3. फेब्रुवारी २०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे योजनेचा शुभारंभ केला होता.
  4. देशातील शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांत वार्षिक सहा हजार रुपये वितरित केले जातात. तर आतापर्यंत १४ हफ्ते वितरित झालेले आहेत

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्रात एकूण २५,६५८.७३ (कोटी) इतका निधी जमा झाला असून नाशिक जिल्ह्यात १,१३९.६१ इतका निधी जमा झालेला आहे.