Gas E-KYC | गॅसची ई-केवायसी केली नसेल तर लगेच करा नाहीतर…!


Gas E-KYC | भारत हा दिवसेंदिवस आधूनिकिरणाकरणाकडे झेप घेत असून अनेक बाबींमध्ये डीजिटलायझेशन कऱण्यात येत आहे. दरम्यान, आता देशातील गॅस जोडणीधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक असून ई-केवायसी असेल तरच तुम्हाला गॅसचे अनुदान दिले जाणार आहे. 

Agriculture News | धान्यांचे वाढते दर; केंद्र सरकारच्या वाढल्या हालचाली

जर तुमची गॅसची ई-केवायसी केलेली नसेल तर तुमच्या गॅसचे अनुदान बंद होऊ शकते. आपण सामान्य ग्राहक म्हणून गॅस जोडणी घेतलेली असेल किंवा महिलांनी उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी घेतली असेल तर तुम्हाला केंद्र शासनाच्या नियमानुसार ई-केवायसी (नो युवर कस्टमर) करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

 Gas E-KYC | ई-केवायसी बंधनकारक का?

 जर तुम्ही गॅस जोडणी केलेली असेल आणि त्याची ई-केवायसी देखील करण्यात आली असेल तर यावरून गॅस जोडणी असलेला ग्राहक तोच आहे, याची खात्री पटणार आहे. यामुळे गॅस अनुदानही ई-केवायसी असेल तरच मिळणार आहे. या ई-केवायसी करण्यासाठीं आपला आधार कार्डची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणीची ग्राहक पुस्तिका गरजेची असते. तसेच ग्राहकाची फेसरीडिंग किंवा थम्स हे पर्याय असून ही प्रक्रिया तत्काळ करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

PM Kisan Yojna | एकाच कुटूंबातील किती लोक ‘या’ योजनेचा लाभ घेऊ शकतात?

भारतात आता घरोघरी गॅस कनेक्शन घेतले जातात यातच ‘वन फॅमिली वन गॅस कनेक्शन’ या केंद्र शासनाच्या धोरणानुसार ही गॅस जोडणी दिली जाते. केंद्र सरकारकडून सामान्य गॅसधारकांना एका सिलिंडरमागे नऊ रुपये, तर महिलांना उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये सबसिडी दिली जाते. दरम्यान, गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांची ओळख पटावी तसेच ग्राहकाची खात्री व्हावी आणि गॅस सबसिडी ही एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणीवर जमा होऊ नये या हेतूने ही गॅस ई-केवायसी मोहीम राबविली जात आहे.