Rain Update | राज्यात अवकाळीचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी


Rain Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस सुरू झाला असून यामुळे मागील खरीप हंगामानंतर आता राज्यातील रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रात झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला यामुळे चिंतेत असणारा शेतकरी आता पुन्हा रब्बी हंगामात होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे चिंतेत आलेला आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

डिसेंबर अखेरीस तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. यातच पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. बुधवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Rain Update
Rain Update

पुढील 24 तासांत राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाने राज्यात सरासरी गाठली नव्हती आणि त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठाही उपलब्ध नाही. दरम्यान, यंदा रब्बीची लागवड कमी झाली होती यातच आता अवकाळीचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे. हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्यालादेखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain Update | नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही..

उत्तर प्रदेशातील थंडीचा कहर सुरूच असून याचा परिणाम देशातील अनेक राज्यांवर होताना दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार नसून पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून काही ठिकाणी दाट धुक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.