Froud Scheme | शेतकऱ्यांनो फसव्या योजनांपासून सावधान! ‘या’ योजनेत होतेय शेतकऱ्यांची फसवणूक 


Froud Scheme | राज्य तसेच केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांमार्फत शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करत असतात. मात्र सध्या वाढत असलेलं आधुनिकीकरण यामुळे राज्यात सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सध्या राज्यात अनेक योजनांच्या खोट्या संकेतस्थळामार्फत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

PM Kisan Yojna | एकाच कुटूंबातील किती लोक ‘या’ योजनेचा लाभ घेऊ शकतात?

अशाच एका योजनेची सायबर चोरट्यांनी फसवे संकेतस्थळ, बनावट एसएमएस पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थातच महाऊर्जाच्या वतीने महाकृषी ऊर्जा अभियान म्हणजे पीएम कुसुम योजना घटक-ब या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. 

Froud Scheme | शेतकऱ्यांनी फसव्या संकेतस्थळांपासून सावध रहा..

नेमकी हीच संधी साधून सध्या राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा सल्ला ‘महाऊर्जा’ने दिलेला आहे. ही योजना राबविण्याकरिता महाऊर्जाच्या वतीने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले असले तरीही सध्या सायबर चोरट्यांकडून वेगवेगळे बनावट संकेतस्थळ आणि सोशल मीडिया प्लॅटफार्ममार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश (SMS) पाठविण्यात येत असल्याचे महाऊर्जा विभागाच्या निदर्शनास आलेले आहे.

Farmers Strike | शेतकरी पुन्हा गाजवणार ‘दिल्ली’

अशा खोट्या आणि फसव्या संकेतस्थळांना न अडकता शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच फसव्या दूरध्वनीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. अशा संकेतस्थळांवर कोणत्याही पद्धतीने पैसे देऊ नये, असे आवाहन महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापकांनी केलेले आहे.