Agriculture News | सध्या संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजलेलं असताना या पार्श्वभुमीवर विरोधकांसह सत्ताधारी कंबर कसत आहेत. यातच यंदा देशासह राज्यात अत्यल्प पाऊस, अवकाळी आणि गारपिटीचा फटका तसेच हवामानीतील बदल या सगळ्या कारणांमुळे अनेक शेती उत्पादनांचे भाव तेजील आले. यामुळे सर्वसामान्यांना मात्र महागाईचा मोठा चटका लागत आहे.
आता लोकसभा निवडणुकींची चाहूल आणि तसेच नवीन धान्याची वाढती महागाई आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वाढता रोष हा आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर सत्ताधाऱ्यांना महागात जाऊ शकतो. दरम्यान, आगामी निवडणुकीत महागाईचा मुद्दा आड येऊ नये म्हणून केंद्र सरकारने भाववाढ रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्याने अशा परिस्थितीत गहू, ज्वारी, तांदूळ तसेच डाळींचे भाव उतरण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यासह देशात यंदा रब्बी हंगामात ११.४ कोटी टन नवीन गव्हाचे उत्पादन होण्याचा अनुमान वर्तवण्यात आला असून त्यामुळे गव्हाला क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव कमी होत आहेत. तसेच ज्वारीचे भाव ८०० रुपयांनी कमी होत आहेत. दरम्यान, यंदा तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून तांदळाच्या निर्यातीमुळे तांदळाचे भाव वधारलेले होते.
Agriculture News | सरकारकडून धान्याची स्वस्तात विक्री
आगामी लोकसभा निवडणुकीत वाढत्या महागाईचा मुद्दा हा सत्ताधाऱ्यांसाठी कळीचा मुद्दा बनु शकतो. या सर्व कारणांमुळे केंद्र सरकारने ‘भारत बँड’ च्या नावाने स्वस्त धान्य दुकान सुरू केले असून यातच आता मॉलमध्येही आटा, तांदूळ आणि डाळ विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सरकारी आटा, तांदूळ तसेच डाळ शहरातील मॉलमध्ये विक्रीसाठी आला नसून सरकारी गोदामात मुबलक प्रमाणात धान्य आणि तांदूळ उपल्ब्ध आहे. यामुळे देशात आटा, तांदूळ तसेच डाळींचे भाव कमी होऊ लागलेले आहेत.