Farmers Suicide | राज्यात शेतकरी आत्महत्येचा कळस; राज्य सरकारची धक्कादायक कबुली


Farmers Suicide | महाराष्ट्रात सध्या काही भागात दुष्काळ तर काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आतेनात नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यातच सतत होणारी नापिकी आणि शेतमालाला भाव नसणं अशा कारणामुळे राज्यात शेकतरी आत्महत्या वाढताना दिसत असून राज्य सरकारने विधिमंडळामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्याची कबुली दिलेली आहे. तसेच या माहितीसोबतच राज्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देखील दिली आहे. जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?

अमरावती जिल्हा – 951
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग – 877
नाशिक जिल्हा – 254
नागपूर जिल्हा – 257
पुणे जिल्हा – 27
लातूर जिल्हा – 64
धुळे जिल्हा – 28

अशा राज्यातील सर्व जिल्ह्यातील एकंदर आकडेवारी पाहता एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्या दरम्यान ही शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली.

Farmers Suicide | शेतकरी आत्महत्येमागील नक्की कारणं काय?

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे आणि आता त्यातच या आत्महत्यांच्या कारणांबाबत विविध प्रश्न समोर येत आहेत. सततची होणारी नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाचे भाव अशा अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आले, हीच नक्की खरी कारणं आहे का?

असतील तर मग, अमरावती 637, औरंगाबाद 584, नाशिक 174, नागपुर 144, पुणे  16, लातुर 98, मराठवाडा 685, धुळे 28 या व्यतिरिक्तदेखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर येत आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी या उपाययोजना राबवू शकता

आता राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे हे समोर आलेले आहे तर मग या आत्महत्या कशा रोखल्या जाऊ शकता हेही जाणुन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची आणि प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबवल्या जात असतात. दरम्यान, विशेष मदतीच्या कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्य विकासासाठी “कृषी समृध्दी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.