Farmers Scheme | ‘या’ योजनेसाठी सरकारने केली जोरदार तयारी!


Farmers Scheme | देशात शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. शेतकरी हीत जपण्यासाठी भारत सरकार अनेक योजना आमलात आणत असतात. यातच, यूपी सरकार आता पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करण्याच्या तयारीत असून त्यासाठी कृषी विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज १६ जानेवारीपासून सुरू झाले असून विशेष म्हणजे कृषी विभागाने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या प्रणालीद्वारे सौरपंप उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यूपी सरकारच्या कृषी विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून पीएम कुसुम योजनेंतर्गत, ज्या भागात वीजपुरवठा नाही किंवा जेथे शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी डिझेल पंप अथवा इतर पद्धती वापरतात, अशा भागांना पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपामध्ये रूपांतरित करण्याची तयारी सरकार करत आहे. ज्या भागात सौरपंप बसवले जाणार आहेत, त्यांनी घेतलेली वीज जोडणी खंडित केली जाणार आहे. याबरोबरच कूपनलिकेत सौरपंप बसविल्यानंतर त्या शेतकऱ्यांना भविष्यात वीज जोडणी दिली जाणार नाही.

Farmers Scheme | सोलर पंपासाठी इतका खर्च येईल

पीएम कुसुम योजनेंतर्गत, 3 एचपी डीसी सबमर्सिबल पंपाची किंमत 232721 रुपये असून, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून 1,39,633 रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 5000 रुपयांच्या टोकन मनीसह 88,088 रुपये द्यावे लागतील. असे 270 पंप य़ुपीतील शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहेत.

Farmers Scheme | ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ या तत्त्वावर शेतकऱ्यांचे बुकिंग

उत्तर प्रदेेशमधील जिल्ह्यांच्या उद्दिष्ट मर्यादेच्या 110 टक्‍क्‍यांपर्यंत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ या तत्त्वावर शेतकऱ्यांचे बुकिंग केले जाणार असून, ऑनलाइन बुकिंगसह शेतकऱ्यांना 5000 रुपयांची टोकन मनी जमा केली जाणार आहे. एका आठवड्यात टोकन मनीची खात्री झाल्यानंतर, शेतकऱ्यांना उर्वरित रकमेचे ऑनलाइन टोकन तयार करावे लागणार आहे आणि ते भारतीय बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा ऑनलाइन चलनाद्वारे जमा करावे लागणार आहे. अन्यथा अर्ज सादर न केल्यास शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात येणार असून याशिवाय टोकन मनीची रक्कमही जप्त करण्यात येणार आहे.