Farmers Scheme | शेतकऱ्यांनो ‘या’ पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारची खास योजना


Farmers Scheme | शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना, ‘या’पिकाच्या लागवडीवर देणार 50 टक्के अनुदान यंदा राज्यातील शेतकऱ्यांना आधी अत्यल्प पाऊस त्यानंतर अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना कराव्यात अशी वारंवार मागणा केली जात होती. यातच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते यातच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बिहार सरकारने आणखी एक नवीन योजना आणली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बिहार सरकारने ‘चहा विकास योजना’ सुरू केली असून या योजनेअंतर्गत बिहार सरकार चहा उत्पादक शेतकऱ्यांना चहाच्या लागवडीवर आता अनुदान देत आहे. तसेच या योजनेनुसार चहाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान बिहार सरकारकडून दिले जात आहे. दरम्यान, हे अनुदान दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल.

बिहार सरकारने ‘ही’ योजना सुरु करण्यामागे कारण काय?

केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात. यातच आता बिहार सरकारने एक नविन योजना सुरू केली असून चहाच्या नवीन क्षेत्र विस्तारासाठी, प्रति हेक्टर प्रति युनिट किंमत 4.94 लाख रुपये निश्चित करण्यात आलेली असताना ज्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के (75:25) एवढे अनुदान मिळणार आहे. ही योजना सुरु करण्यामागील उद्देश म्हणजे राज्यातील चहाचे उत्पादन वाढवणे आणि त्यासाठी बिहार सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न आता केला जातो आहे.

Farmers Scheme | या योजनेसंदर्भात माहिती कशी मिळवाल?

बिहार राज्यातील ‘चहा विकास योजने’साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी किशनगंज जिल्ह्यातील चहा उत्पादक शेतकरी बिहार सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाच्या  https://horticulture.bihar.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकणार आहेत. तसेच तिथे तुम्ही ‘चहा विकास योजना’च्या ‘अप्लाय’ लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती घेऊ शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक फलोत्पादन संचालकांशी संपर्क साधू शकता.