Farmers News | भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. यातच, केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य तसेच शेती आधूनिकिकरणाचं प्रसार हा सध्या सातत्याने सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहीती समोर येत आहे.
देशातील श्रीमंत शेतकऱ्यांवर भारत सरकार कर लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून APMC सदस्याने ही माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीकडून (MPC) देशातील शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Farmers News | शेतकऱ्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा विचार
देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना देशात राबवल्या जात असतात आणि यातच आता देशातील श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावणार असल्याची शक्यता APAC सदस्या आशिमा गोयल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, एकीकडे सरकार लहान आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करत असून दुसरीकडे, देशातील करप्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांना कर भरायला लावण्याचा विचार सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.
Farmers News | 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प होणार सादर
यातच सध्या देशात लोकसभा निवडणुकांची धूम सुरू झाली असून केंद्र सरकार शेतीविषयक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून यापूर्वी APAC सदस्या आशिमा गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, सरकार कमी दर आणि किमान सूट असलेल्या श्रीमंत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आयकर लागू करण्याची शक्यता आहे. भारतातील कृषी उत्पन्नावर कर लादण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशिमा गोयल यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.