Farmers News | केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतात. आजकाल शेती तांत्रिकीकरणाकडे केंद्र आणि राज्य शासनाचा कल वाढलेला दिसतो आहे. दरम्यान सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजने अंतर्गत कोल्हापुर जिल्ह्यातील 1751 विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील 1659 संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी ‘हार्डवेअर’ देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची माहिती घेण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे.
“सहकार से समृद्धी” ही संकल्पना साकार करण्यासाठी सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी तसेच देशाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सहकारी संस्थांची कार्यक्षमता, उत्पादकता आणि नफा वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. विकास संस्थानिहाय प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक कुंडलीच पहायला मिळणार असून केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत कर्जमाफीसह इतर कोणती योजना राबवायची झाल्यास एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
Farmers News | नाबार्ड करणार थेट शेतकऱ्यांना कर्जपुरवठा?
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ही मुंबईमध्ये स्थित तसेच भारतातील सर्वोच्च बँक असून भारताच्या ग्रामीण भागात कृषी कर्ज, नियोजन आणि ऑपरेशनच्या धोरणात्मक बाबी आणि इतर आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित क्षेत्रांमध्ये नाबार्डला ओळखले जाते. नाबार्डच्या माध्यमातून देण्यात येणारा पीक कर्जपुरवठा सध्या जिल्हा बँक, विकास संस्था ते शेतकरी असा होत असतो. दरम्यान यामध्ये प्रत्येक वित्तीय संस्थेचे व्याजाचे मार्जीन राहते आणि आता त्याऐवजी नाबार्ड विकास संस्थांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर विचारविनिमय सुरू आहे.
- जेनेरिक औषधांची दुकान
- पेट्रोलपंप
- किसान समृद्धी केंद्र
- सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर)
- जलजीवन पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन
गोडावून बांधणे यासह १५२ व्यवसाय सुचवण्यात आलेले आहेत.