Farmers Suicide | नाशकात शेतमजुराची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको 


Farmers Suicide | सध्या देशासह राज्यात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहे. यातच राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या कमी होण्यासाठी नविन टास्क फोर्सचं पुनर्गठणदेखील केलं होतं. मात्र तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच गुरूवारी दिक्षी येथे शेतमजुराने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून राहूल अलबाड (१९) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

नाशिक जिल्ह्यातील या आत्महत्येमुळे संपुर्ण माशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून दिक्षी गावातील रमेश टर्ले यांच्या शेतात राहूल याने आत्महत्या केली असता मृताच्या नातेवाईकांकडून शेतमालकावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. मृताचे वडिल निवृत्ती अलबाड यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली तसेच मृताचा मृतदेह रस्त्यावर आणत तब्बल सहा तास दिक्षी सुकेणे येथे मृताच्या संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको देखील केला. या प्रकरणी, ओझर पोलीस ठाण्यात शेती मालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर मृताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Farmers Suicide
Farmers Suicide

Farmers Suicide | नेमकं प्रकरण काय ?

फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल अलबाड हा सध्या दिक्षी येथे वास्तव्यास होता. मोलमजूरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता आणि त्याने गावातील शुभम टर्ले याच्याकडून बहिणीच्या लग्नासाठी चाळीस हजार रुपये उचल घेतली होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी शेतकरी टर्ले यांच्या मुलाने राहुलला सकाळी त्याच्या घरी जाऊन कामावर येण्याचा हट्ट धरला होता. त्यावेळी राहुलने मी आजारी आहे, कामावर येऊ शकणार नाही, असे सांगितले असता टर्ले याने त्यास जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून द्राक्षबागेच्या शेतात नेले आणि शिविगाळ करुन मारहाण केली.

याच सर्व मानसिक त्रासाला कंटाळत राहुल याने शुभम टर्ले याच्या शेतात विषारी औषध सेवन करूण आत्महत्या केली. राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर राहुलच्या नातेवाईकांनी दिक्षी सुकेणे येथे तब्बल सहा तास रास्ता रोको कोला असता या प्रकरणानंतर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.