Weather Update | अवकाळीनंतर महाराष्ट्र पुन्हा गारठणार!


Weather Update | डिसेंबर २०२३ च्या सुरूवातीपासून राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढू लागला होता. दरम्यान, यातच डिसेंबरअखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीस अवकाळी पावसाचा अंदाज हावामान विभागाने वर्तवलेला होता. पश्चिमेच्या दिशेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात आजपासून पावसाचे प्रमाण कमी होत हवेतील गारवा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 

Weather Update
Weather Update

Weather Update | नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पावसाची नोंद

राज्यासह नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी बरसत असून राज्यातील बहुतांश भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. यातच नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पावसाची नोंद करण्यात आली. तर, कोकणात आणि 0.5 मीमी पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये 7.8 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहीतीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेली हवेची द्रोणीय रेषा तसेच आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रीत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Weather Update | उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढणार

राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असून त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार आहे. तर राज्यात पुढील दोन दिवस कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.  त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.