Farmer News | राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतमाल आता नव्या पद्धतीने विक्री करता येणार आहे.
Farmer News | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल आता थेट अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्याना विकता येणार आहे. या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांना आता त्यांचा शेतमाल ऑनलाईन विकता येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, ‘शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येतील. महाराष्ट्राचे तंत्रज्ञानाविषयी पाऊल क्रांतिकारक ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
Farmer News | काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..?
राज्य सरकारने आता कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा प्रारंभ केला आहे. तर, सबसिडीतून आणि नुकसानभरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २०१४ ते २०१९ या काळात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट योजना यांसारख्या योजनांची आखणी झाली. ‘वातावरणपूरक शेती’चा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
Farmer Scheme | शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजनांचा प्रारंभ करण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून, कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत सामंजस्य करार झाले आहेत. ज्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज आहे. तसेच पुढील टप्पाच्या प्रारंभाबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे अभिनंदन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी केले आहे. (Farmer News)
कृषी विभाग, ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन‘, ‘मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन’ (SMART) प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक-२०२४ सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, तसेच विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी यांच्यासह उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Farmer Scheme | शेतकऱ्यांनो…! आता घरबसल्या घ्या या योजनेचा लाभ
या बैठकीत शेतकऱ्यांची उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला. कृषी मूल्य साखळी बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्ये, सोयाबीन, फळे, भाजीपाला आदी शेतकरी उत्पादक ५९ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून ४२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असतात. (Farmer News)