Dragon Fruit | ड्रॅगन फ्रूट लागवडीवर शासन देतंय शेतकऱ्यांना अनुदान


Dragon Fruit | ड्रॅगन फ्रूट हे खूप लोकप्रिय फळ आहे, ज्याची मागणी बाजारात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ड्रॅगन फ्रूट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदा होतो. या फळाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिहार सरकार हे अनुदानदेखील देत ​​आहे.

बिहार सरकार राज्यात ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीवर भर देत असून त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. फलोत्पादन संचालनालय, कृषी विभाग, बिहार सरकारच्या मते, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जात आहे. दरम्यान, ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्याला 1.25 लाख रुपये प्रति युनिट खर्चाच्या 40 टक्के म्हणजेच 50,000 रुपये मिळणार आहेत. ही अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाणार आहे.

Dragon Fruit | ड्रॅगन फळांच्या लागवडीला प्रोत्साहन

बिहार सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट लागवड, शेत तयार करणे, सिंचन, तण नियंत्रण, कीटकनाशक नियंत्रण, काढणी आणि इतर खर्चासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि राज्यात ड्रॅगन फ्रूट लागवडीला चालना देणे हा असून ड्रॅगन फ्रूट झाडे लागवडीनंतर सुमारे 18 महिन्यांनी फळ देण्यास सुरुवात करतात.

ड्रॅगन फ्रूट हे स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ असून ड्रॅगन फ्रूटची लोकप्रियता वाढते आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात. ड्रॅगन फ्रूटचा वापर फळे, ज्यूस आणि मिठाईमध्ये केला जात असतो.