Drone | आता ड्रोनच्या मदतीने होणार बटाट्याची स्मार्ट लागवड


Drone | सध्या भारतात आधूनिक कृषी तंत्रज्ञानावर भर दिला जात असून आता याच संदर्भात एक मोठी अपडेट येत आहे. देशातील शेतकरी आता ड्रोनच्या मदतीने बटाट्याची स्मार्ट शेती करणार असून केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने (CPRI) दोन वर्षांच्या सूक्ष्म चाचण्यांनंतर बटाटा पिकासाठी कृषी ड्रोन व्यवस्थापनाची शिफारस केलेली आहे.

सीपीआरआयच्या उत्तर प्रदेशातील मोदीपुरम (मेरठ) प्रादेशिक स्टेशन आणि पंजाबमधील जालंधर येथे दोन वर्षांपासून ड्रोन वापराच्या चाचण्या घेत होतं. ड्रोनच्या वापरामुळे पीक उत्पादनाचा खर्च, वेळ आणि पाण्याची बचत होणार असल्याचे आढळून आले. सीपीआरआयच्या चाचण्यांनी पुष्टी केली आहे की ड्रोन वापरून एक एकर फवारणीसाठी फक्त 10 लिटर पाणी पुरेसे असून, तर पारंपारिक फवारणीसाठी 100 ते 150 लिटर पाणी आवश्यक आहे. एवढेच नाही तर फवारणीसाठी कमी प्रमाणात नॅनो खते किंवा कीटकनाशकेही लागतात.

Drone | पारंपरिक फवारणीपेक्षा ड्रोनने फवारणी करणे स्वस्त

ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याला रसायनांपासून कोणताही धोका होणार नाही. बटाट्याचे पीक 90 ते 110 दिवसांच्या कमी कालावधीत तयार होते, त्यामुळे रोगांपासून बचाव करण्यासाठी कीटकनाशकांचा वारंवार वापर करावा लागतो. तर मग आता पारंपरिक फवारणीपेक्षा ड्रोनने फवारणी करणे स्वस्त आहे. एवढेच नव्हे तर बटाटा पिकांवर ड्रोनने फवारणी अधिक अचूक आणि कार्यक्षमतेने करता येते.

चाचणीमधील पुढील अहवाल, ड्रोनमधून उत्सर्जित केलेल्या सूक्ष्म थेंबांचे कव्हरेज वनस्पतींवर, मध्य आणि खालच्या तीन स्तरांवर चांगले असल्याचे आढळले असून कृषी मंत्रालयाने सीपीआरआय आणि कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 2 ड्रोन दिलेले आहेत. दरम्यान, केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने (CPRI)केलेल्या मागणीनुसार देशात ड्रोनच्या मदतीने होणार बटाट्याची स्मार्ट लागवड होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.