Cold Update | वाढत्या थंडीमुळे ‘या’ भागातील शाळा राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


Cold Update | सध्या संपुर्ण देशभर थंडीने कहर केला असून अनेक राज्यांमधील तापमानाचा पारा घसरत आहे. या घसरत्या तापामानामुळे महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असून द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढलेली आहे. यातच संपुर्ण देशभरातील शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला असून शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातही थंडीचा कडाका कायम असून दाट धुके आणि थंडीच्या लाटेमुळे उत्तर प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. या धुक्यामुळे राज्यातील विमान सेवा आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत असून हवामान अहवालानुसार आणखी काही दिवस ही थंडीची लाट कायम राहणार आहे.

Cold Update | वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे….

तसेच, आज शुक्रवार रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा दिवस तसेच दाट धुक्याचा इशारा देण्यात आला असून त्याच वेळी, पूर्वांचलमध्ये सततच्या जोरदार पूर्व वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होत आहे. विभागीय हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी दाट धुके आणि थंडीचे दिवस अपेक्षित असून यासोबतच सहारनपूर, शामली, मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, हापूर, बिजनौर, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, बरेली तसेच आसपासच्या परिसरात कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अचानक देशात वाढलेल्या थंडीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरीकदेखील मोठ्या प्रमाणात त्रासलेले असून वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे आभाळातील ढगांनी दव थेंब थांबवले असून वातावरणात धुकेवरच्या दिशेने वाढलेले आहे. त्यामुळे जमिनीवरील स्थिती काही प्रमाणात सुधारली असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Cold Update | 22 जानेवारीपर्यंत शाळा बंद राहतील

आता या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील घसरत्या तापमानामुळे अनेक जिल्ह्यांत शाळांच्या सुट्या २० जानेवारीपर्यंत वाढवण्यात आल्या असून कानपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 20 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट पाहता जिल्ह्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये सुटी वाढवण्यात आली असून जिल्हादंडाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी हा आदेश जारी केलेला आहे.