Weather News | आज राज्यात ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

Weather News | पावसाने उसंत घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा बसू लागल्या असून तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेला आहे. तर आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. Weather Update … Read more

Agro News | टोमॅटोच्या आवाकीत घट; व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत

Agro News | सध्या टोमॅटोची आवक घटली असून नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डमध्ये व्यापारी ट्रक भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इतर वेळी काही तासात भरणारे ट्रक आता दोन-दोन दिवस उभे असल्याचे दिसू लागले असून व्यापारी माल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर, पुढील काळात बाजार भाव टिकून राहणार असल्याची माहिती बाजार समिती यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. Agro News | … Read more

Agro News | केळीचे दर 1600 रु. प्रतिक्विंटल वर स्थिर; विक्री दरात मात्र मोठी तफावत

Agro News | केळीला स्थानिक भागात सध्या सरासरी 1600 रुपयांचा दर मिळत आहे. तर दुय्यम दर्जाची केळी 700 रुपयांनी विकली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. मागील काही दिवसापासून केळीला चांगला दर मिळाला असून अकोल्यातही काही दिवस केळीची 1800 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री झाली आहे. परंतु हा दर नंतर दोनशे रुपयांनी कमी होऊन आता 1600 … Read more

Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

Bangladesh Onion Export

Onion News | किरकोळ बाजारात कांद्याची मागणी वाढलेली असताना सध्या आवक कमी झाल्याने कांद्याचा प्रतिकिलोचा दर 70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यात नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर पर्यंत वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली … Read more

Weather Update | आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update | परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. काही ठिकाणी अधून मधून जोरदार पाऊस पडत असून कोकण, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये हलक्या तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. गुरुवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापुरातील मैंदर्गी येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. Weather … Read more

Agro News | पावसामुळे यंदा मिरज पूर्व भागात ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटण्या

Agro News | मिरज पूर्व भागात बेळंकी, संतोषवाडी, सलगरे, खटाव परिसरातील द्राक्षाचे क्षेत्र वाढले असून या भागातील शेतकरी नैसर्गिक संकटांवर मात करत दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले आहेत. यंदा या शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता ऑगस्ट सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरमध्ये छाटणी घेण्यास पसंती दर्शवली असून परिसरात फळ छाटणीला सुरूवात केली आहे. मागील वर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै ऑगस्टमध्ये … Read more

Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली

Onion Market

Onion News | बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव पद्धतीने 19 साधनातून आवक करण्यात आला होतो. यावेळेस कांद्याला 3875 रु. इतका सर्वाधिक भाव मिळाला. Onion News | कांदा अनुदानापासून शेतकरी वंचित काय मिळाला दर प्रथम श्रेणी कांद्याला 3600 ते 3875 तर द्वितीय श्रेणीच्या कांद्याला 2850 ते 3575 … Read more

Agro News | देशातील भव्य कृषी विज्ञान संकुलाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Agro News | मालेगावातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा उद्या शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता काष्टी फाटा, नामपुर रोड मालेगाव येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील … Read more

Rain Update | आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

Rain Update | राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. ज्यामुळे आता सकाळी धोक्याची चादर पसरू लागली असून अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग येऊ लागलाय. मात्र काही ठिकाणी अधून-मधून तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बुधवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत … Read more

Agro News | सरकारच्या ‘काजू बी’ अनुदान योजनेला मुदतवाढ

Agro News | राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिले, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेत 2024 च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजु बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. Agro News | गेल्यावर्षी झालेल्या खरीपाच्या नुकसानीची भरपाई … Read more