Agro News | सरकारच्या ‘काजू बी’ अनुदान योजनेला मुदतवाढ


Agro News | राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिले, तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेत 2024 च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजु बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

Agro News | गेल्यावर्षी झालेल्या खरीपाच्या नुकसानीची भरपाई मिळणार

31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

या योजनेला दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, 7/12 उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याच्या क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इत्यादी तपशिलासह अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकडे सादर करायचे आहेत.

या योजनेसाठी काजू उत्पादक लाभार्थी असतील तर त्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू लागवडीखालील क्षेत्र झाडांची नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूंच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू उपयोग उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

Agro News | केळीच्या दरात घसरण कायम

योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया पणन मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

त्याचबरोबर, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे काजू उत्पादन शेतकऱ्यांनी नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बीची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदी दाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक आहे. तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बीसाठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणीबाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अधिक माहितीसाठी पणन मंडळ कार्यालयाकडे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे. (Agro News)