Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत करणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य

Agro news | राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणीसह मराठवाड्यातील बीड, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये पावसानं पिकांसह जमिनीचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, त्याचबरोबर नुकसानबादी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषी … Read more

Nashik | नाशिकात यंदा समाधानकारक पाऊस; धरणे तुडुंब भरली

Nashik : नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली, त्यामुळे धरणं तुंबून भरली आहेत. सध्या काही काळ पावसाने विश्रांती घेतली असून हलक्या सरी अधून मधून हजेरी लावत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण धरणांत जवळपास 94.26% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागच्या वर्षी हा साठा 67.22% इतकाच होता परंतु यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांनी शंभरी गाठली … Read more

Agro News | खुशखबर! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेला ग्रीन सिग्नल

Agro News : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज देणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत पुरवणी मागण्यातून 2,750 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला 2,750 कोटी रुपये देण्यास मंगळवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी मंजुरी दिली. Agro … Read more

Agro News | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारची खेळी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Agro News : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कांद्याचा बाजारभाव जवळ जवळ 4700 पर्यंत गेला होता. अशातच केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणला आहे. कांद्याच्या वाढत्या दराला लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असून यामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. … Read more

Agro News | कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी 13 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या नोंदण्या

Agro News | खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार असून याकरिता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. कृषी सहायकांनी बहिष्कार टाकल्यामुळे नोंदणीची कामे रखडली होती. परंतु या मदतीसाठी राज्यातून आतापर्यंत 13 लाखाहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. कृषी आयुक्तालयाच्या … Read more

Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी

Maharashtra Rain Update

Weather Update | मागील दोन-तीन दिवसांपासून मराठवाडा विदर्भात पावसाने एकच धुमाकूळ घातला होता. नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. आज मात्र पावसाचा जोर ओसरला असून राज्यातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. यवतमाळ मधील नरखेड महागाव येथे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र मागील दोन-तीन दिवस सलग झालेल्या पावसानं … Read more

Agro News | शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार

Agro News | सरकारकडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 4,194 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. हे अर्थसाह्य येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कापूस … Read more

Agro News | ‘सरकारचा कांद्याचा भाव पाडण्याचा डाव’; स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधवांचा आरोप

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | “नाफेड” कडून बफर स्टॉक केलेला कांदा केंद्र सरकार बाजारात आणून कांद्याचे भाव पडणार असल्याची संताप जनक प्रतिक्रिया कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटू लागली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णायाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचा पोशिंदा सर्जा राजा देखील पुढे सरसावला असून, बैल पोळा सणा निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला सजवून त्यावर “नाफेड … Read more

Heavy Rain | राज्यात पावसाचा हाहाकार; घरांमध्ये पाणी, जनावरही वाहून गेली

Heavy Rain | काही दिवसांकरिता विश्रांती घेत पावसाने पुन्हा एकदा राज्यभर हजेरी लावली आहे. राज्याचा दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातील काही भाग कालपासून पाण्याखाली गेला असून हिंगोली, छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. नांदेड जिल्ह्यामधील हदगाव मधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याचा वेढा बसला आहे. या गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं … Read more

Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?

Weather Update

Weather Update | हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार आज शनिवार 30 ऑगस्ट पासून पुढील चार-पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल होणार असल्याचे हवामान खात्याच्या अहवालात नमूद केले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. … Read more