AI Technology | AI तंत्रज्ञानामुळे आता अनेक गोष्टी सहज शक्य होत आहेत. शेतीच्या संबंधित अनेक कामांमध्ये आता या तंत्रज्ञानाचा उपयोग होताना दिसत आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्ये प्रशासनाने आणखी एक अनोखी योजना राबवली आहे.याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे शेती आणि पिकांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. हिवाळा ऋतुत शेती पिकांवर अनेक प्रकारचे रोग पडतात. दरम्यान, जर तुम्हाला पिकाविषयी समस्या असतील तर, तर त्या पिकांचा फोटो काढून तुम्हाला कृषी विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला घरात बसून पिकांशी संबंधित सर्व रोगांवरील माहिती मोफत मिळणार आहे.(AI Technology)
पिकांवरील रोग आणि समस्यांवर घरपोच उपाय किंवा माहिती मिळावी यासाठी संबंधित कृषी विभागाने दोन व्हॉट्सॲप क्रमांक जारी केलेले आहेत. याक्रमांकांवर पिकांचे फोटो पाठवून शेतकऱ्यांना समस्येचे निराकरण करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक, गावाचे नाव, विकास गटाचे नाव नमूद करून त्यांच्या शेताचा आणि पिकाचा फोटो हा कृषी विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे. यानंतर कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून संबंधित शेतकऱ्याच्या समस्येचे निराकरण हे त्याच्या मोबाइलवर त्वरित पाठवले जाईल.
Rain Alert | ‘या’ भागात बरसणार अवकाळी..
AI Technology | शास्त्रोक्त शेती करणे सहज शक्य
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य सल्ले मिळावे यासाठी कृषी विभागाने 9452247111 आणि 9452257111 हे दोन क्रमांक जारी केले आहेत. यामुळे आता एका फोटोवर क्लिक करून किंवा वरील नंबरवर एसएमएस करून तुम्हाला थेट शास्त्रज्ञांकडून उपाय मिळणार आहेत. यामुळे त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे सहज शक्य होणार आहे. (AI Technology)
दरम्यान, कृषी विभागातर्फे ही सुविधा शेतकऱ्यांना मोफत दिली जाणार आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा लाभ वेळोवेळी मिळत राहणार आहे. सध्या देशातील सर्वच राज्यांत थंडी आहे. या थंडीमुळे लोकच नाहीतर पिके आणि जनावरेही आजारी पडू शकतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर आणि जनावरांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहनही यावेळी कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्याच्या कृषी विभागाने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
AI Technology | महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कमाल; प्रथमच AI तंत्रज्ञानाने पिकवला भाजीपाला
पिकांवर होऊ शकतात ‘हे’ रोग
बटाटा व टोमॅटो या भाज्यांवर याकाळात बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असते. तसेच वांग्याच्या पिकावरही खोडकिडी आणि इतर प्रादुर्भाव होण्याची शक्यता थंडीच्या काळात वाढते. त्यामुळे या हंगामात पिकांवरील हे रोग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा फायदा घ्यावा. वेळोवेळी आपल्या शेताची आणि शेतपिकांची पाहणी करावी. तसेच तुमच्या पिकांवर या रोगांची लक्षणे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांनी बुरशीनाशक कीटकनाशकांची तातडीने फवारणी करावी.(AI Technology)