Agro News | श्रीगोंदा बाजार समिती म्हैसूर आणि गाझियाबादमध्ये विक्रीकेंद्र उभारणार


Agro News | कांदा व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हैसूर, गाजियाबाद येथे कांदा, लिंबू व इतर शेतमाल विक्रीसाठी केंद्र तयार करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

Agro News | सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी खुशखबर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज अर्थसहाय्य वितरित

बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली यावेळी ते बोलत होते. कांदा अनुदान घोटाळाप्रकरणी सहाय्यक निबंधक आणि लेखा परीक्षण अधिकाऱ्यांसह आरोपी करण्याची मागणी आहे ते दोषी आढळल्यास त्यांना सहआरोपी केले जाईल. तसेच दिलीप देवरे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले जाईल. असे लोखंडे यावेळी म्हणाले.

तर, माजी आमदार राहुल जगताप यांनी “बाजार समितीच्या सभापती सहसंचालक मंडळ चांगले काम करीत असून बाजार समितीची घडी बसवण्यासाठी त्यांनी काम केले आहे. टिळक भोस यांनी कांदा अनुदानातील घोटाळा आणि शेतकऱ्यांची लूट, काष्टी बाजाराच्या बाहेर ग्रामपंचायतीकडून बेकायदा वसुली सुरू असल्याकडे लक्ष वेधले.

Agro News | सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध शिथिल; निर्यात शुल्कात देखील घट

सभेला यांनी दर्शवली उपस्थिती

यावेळी बाबासाहेब इथापे, बाळा साहेब नलगे, बाळासाहेब गिरमकर, महेश तावरे, ॲड. विठ्ठल काकडे, राजेंद्र म्हस्के, शंकर भुजबळ, हनुमंत जगताप, शांताराम पोटे यांनी आपले विचार मांडले. प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी अहवाल वाचन केले. यावेळी केशव भाऊ मगर, हरिदास शिर्के, लक्ष्मण नलगे, विजय मुथा, नितीन डुबल, रामदास झेंडे, अशोक नवले आदी उपस्थित होते. तसेच ॲड. महेश दरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (Agro News)