Agro News | देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. तर नाशिकला ‘द्राक्षपंढरी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हा यंदा नाशिक जिल्ह्यामध्ये बंपर द्राक्ष उत्पादन हंगामाची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यातील लाख क्षेत्रावर नियमित द्राक्षांची लागवड करण्यात आली असून सटाणा बागलाणमध्ये द्राक्षाची छाटणी सुरू झाली असली तरी पावसामुळे निफाड, दिंडोरी, सिन्नर, येवला तालुक्यात द्राक्षांच्या छाटणीला ब्रेक लागला होता. परंतु रविवारी 29 सप्टेंबर पासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे छाटणी पुन्हा सुरू झाली असून नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर द्राक्ष छाटणीला अधिक वेग येईल. नाशिक मधून द्राक्षाचा पहिला कंटेनर रशियासाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात रवाना होईल.
Agro News | श्रीगोंदा बाजार समिती म्हैसूर आणि गाझियाबादमध्ये विक्रीकेंद्र उभारणार
यंदा द्राक्षांचे उत्पादन 20 लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
शेतकऱ्यांसाठी अर्ली द्राक्ष हंगाम अधिक महत्त्वाचा असतो. निफाड दिंडोरी आणि नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असून विशेष म्हणजे राज्यातील 91% द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असून यावर्षी द्राक्ष बागा चांगल्या स्थितीत आहेत. द्राक्ष उत्पादकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या म्हणण्यानुसार हवामानाची परिस्थिती समाधान कारक राहिल्यास राज्यातील उत्पादनात यंदा 20 लाख टणांपर्यंत पोहोचू शकते. मागच्या हंगामात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे 30% काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम होऊन केवळ 12 लाख टन इतकीच झाली होती. परंतु यंदाच्या हंगामात ही पोकळी भरून निघण्याची आशा असून जानेवारीपासून युरोपमध्ये द्राक्षांचे कंटेनर रवाना होतील. द्राक्ष निर्यातदारांसाठी पिंपळनेरला 3 ऑक्टोबरला चर्चासत्र आयोजित केले आहे.
तर सध्या सुरू असलेल्या इजराइल आणि हिज्बूल्लाह युद्धामुळे सर्वच देशांची चिंता वाढली असून इजराइल आणि हिज्बूल्लाहमध्ये संघर्ष वाढतच आहे. युद्ध थांबले नाही तर यंदाही नाशिकसह राज्यातून युरोपात आयात होणाऱ्या द्राक्षांच्या प्रवासावर त्याचा परिणाम होणार असून द्राक्षांना आफ्रिका खंडातुन 42 दिवसांचा लांबचा प्रवास करावा लागणार आहे. सुवेझ कालव्यातून नेहमीप्रमाणे द्राक्षे युरोपात जात असतात. सुवेझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडत असल्यामुळे युरोपमधून आशियापर्यंतचा सर्वात लहान सागरी मार्ग आहे. तर बांगलादेशने प्रति किलो द्राक्षांसाठी लागू केलेले शंभर रुपये आयात शुल्क याचेही विपरीत परिणाम द्राक्ष निर्यातीवर होण्याचा अंदाज आहे.(Agro News)