Agro News | नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यातही महिला शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी कांद्यासारख्या पिकावर प्रक्रिया करून कांदा पावडर, पेस्ट, करप निर्मिती करावी व त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सौर वाळवणासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. असे आवाहन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले आहे.
Agro News | परतीच्या पावसानं सोयाबीन पाण्यात
कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन
कृषी विज्ञान केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. बच्छाव व कृषी विज्ञान केंद्राच्या अध्यक्षा मेघा बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. 23 ते 28 या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा करण्यात आला असून या सप्ताहानिमित्त कृषी विज्ञान केंद्रा तर्फे रब्बी हंगाम पूर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन अजंग ( ता. मालेगाव) येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मेघा बोरसे होत्या व त्यांनी यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या वाटचालीबाबत माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचा फायदा घेण्यास आवाहन केले. या कार्यक्रमावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे, सरपंच ज्ञानदेव पवार तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Agro News | पीएम किसानचा 18 वा हप्ता मिळवण्यासाठी हे काम पूर्ण असणे आवश्यक!; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शने
यावेळी डॉ. बच्छाव यांनी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे व सुधारित वाणांची लागवड करण्यासह मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादनासारखे पूरक व्यवसाय तर ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणी अधिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. दरम्यान, उद्यानविद्या विषय विशेषतज्ञ पवन चौधरी यांनी सुधारित रब्बी कांदा लागवड तंत्रज्ञानासंबंधीत माहिती दिली. तर डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र प्रमुख डॉ. सचिन हिरे यांनी डाळिंबासाठी आवश्यक हवामान, जमिनीची निवड याबाबत मार्गदर्शन केले. विशाल चौधरी यांनी देखील यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.