Agro News | मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून काढणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाण्यात गेले आहे. शेंगा भिजल्याने सोयाबीन खराब झाले असून काही ठिकाणी सोयाबीन काढणी करून देखील फायदा नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसामुळे चिखल झाल्याने सोयाबीन काढणी ठप्प झाली असून या दरम्यान लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, घरांची पडझड किंवा पशुधनाची हानी झाली असल्यास त्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करून बाधितांना मदकरावी. तसेच पुरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
Agro News | परतीच्या पावसाने खरीप पिकाच्या काढणीत अडथळा
पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये सतर्कता
मुसळधार पावसामुळे नद्या, सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीच्या उपाय योजना तातडीने सुरू करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी बुधवारी दूरदृष्टी प्रणाली द्वारे आढावा घेतला. यावेळी पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारी बाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
तेरणा आणि मांजरा नदीत सूर असलेल्या पाण्याच्या विसर्गाने तसेच इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या सर्व नद्यांच्या काठावरील गवांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, तसेच नागरिक आणि आवश्यकता असल्यास करून द्यावी. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. याची दक्षता घ्यावी असे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले तसेच संभाव्य पूर्ण परिस्थिती लक्षात घेत गावनिहाय शोध पथके आणि आरोग्य पथके सज्ज ठेवावीत असे देखील त्यांनी सांगितले.
आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर यामध्ये कोणतीही विलंब होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गाव ते जिल्हा पातळीवर अनेक अधिकारी कर्मचारी यांनी सतर्क राहून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत राहावा. असे देखील पालकमंत्री महाजन म्हणाले. त्याचबरोबर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच सर्व संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष फिल्डवर नुकसानीचा व पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सर्व विभागांच्या समन्वयाने खबरदारीच्या उपायोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी ठाकूर यांनी सांगितले.(Agro News)