Agro News | कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारची खेळी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट


Agro News : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कांद्याचा बाजारभाव जवळ जवळ 4700 पर्यंत गेला होता. अशातच केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणला आहे. कांद्याच्या वाढत्या दराला लगाम घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असून यामुळे शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Agro News | कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी 13 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या नोंदण्य

कांद्याची भाववाढ होऊ नये म्हणून सरकारचा निर्णय

लासलगाव सोबत नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये मागील काही आठवड्यात कांद्याचे बाजार भाव 4000 रुपयांच्या आसपास पोहोचल्यानंतर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 30 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढत खरेदी केलेल्या जवळ जवळ पाच लाख मेट्रिक टन कांद्यापैकी मोठ्या प्रमाणात कांदा हा देशांतर्गत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील नाफेडमध्ये एनसीसीएफच्या गोदामा साठवलेला कांदा प्रतवारी करत गोण्यांमध्ये भरून देशांतर्गत मागणी असलेल्या ठिकाणांवर पोहोचवला जाणार आहे.