Agro News | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी नायफेडच्या कांदा प्रश्नांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार झाला असून, यामध्ये नाफेडच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मुळात सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच काढल्या आहेत का? असा संतप्त सवाल करत. या प्रकरणाची मुळापासून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??
Agro News | नाशिकमध्ये बच्चू कडुंची तोफ कडाडली
नाशिकमध्ये प्रहार संघटनेकडून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बच्चू कडूंनी नाफेडच्या गोडाऊनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळा प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. “काही दिवसांपूर्वी नाफेड कांदा खरेदी घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींकडून सरकारला जाब विचारण्यात आला. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी लासलगाव येथील नाफेडच्या कांदा गोडाऊनला भेट दिली होती आणि यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यातून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. याबाबत 25 सप्टेंबरला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर या प्रकरणी केंद्र सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे. (Agro News)
Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात नवीन मका खरेदीचा शुभारंभ
कांदा स्वस्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात हात का घालता?
“तुम्हाला ग्राहकांना कांदा स्वस्त द्यायचा असेल, तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून कांदा स्वस्त का करता? तुम्ही बजेटमध्ये हात घाला ना.” असाच थेट सवाल करत कडूंनी “वाढवलेले भाव कमी करण्याची तुमची मानसिकता आहे. पण कमी झालेले भाव वाढवण्यासाठी सरकार समोर येत नाही. भाव वाढल्यावर जसा हस्तक्षेप करता, तसा कमी झाल्यावर का करत नाही? असे सवाल करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Agro News)