Agriculture News | शीत लहरींमुळे होऊ शकते पिकांचे नुकसान; असे करा संरक्षण


Agriculture News | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या थंडी आणि धुक्याचा परिणाम दिसून येत असून अशा परिस्थितीत भाजीपाला तसेच अनेक पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. देशासह राज्यातील वाढती थंडी आणि दुष्काळाच्या ताणापासून पिके तसेच भाजीपाला यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून पिकांचे संभाव्य नुकसान होण्यापासून ते वाचवू शकतात.

महाराष्ट्रात सध्या अवकाळीने कहर केला असून राज्यातील तापमान घसरताना दिसत आहे. यातच देशातील अनेक भागात सध्या वातावरणात गारवा वाढत आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढत असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे थंडीच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी आणि शेतात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सायंकाळी हलके सिंचन करायचा सल्ला कृषी तज्ञ देत आहेत.

दरम्यान, याचबरोबर शेतकरी त्यांच्या शेतात तुषार सिंचन देखील करू शकतात आणि नवीन रोपांचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेत पेंढा किंवा पॉलिथिनने झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. थंडीपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी जे शेतकरी कांदा आणि टोमॅटोची लागवड करणारे असतील ते यावेळी या दोन भाज्या लावू शकतात. यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं मानलं जात आहे.

Agriculture News
Agriculture News

Agriculture News | देशातील वेगवेगळ्या भागात कशी आहे पिकांची स्थिती?

तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांनी तीळ, सूर्यफूल, मका, मूग, उडीद, टरबूज, खरबूज या पिकांची पेरणी सुरू करावी. तसेच हरभऱ्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी परिपक्व लाल हरभऱ्याची काढणी करावी याचबरोबरच भाताची रोपवाटिका आणि मका, कडधान्ये आणि नाचणी पेरणीसाठी ही योग्य वेळ असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. तर तामिळनाडूमध्ये शेतकरी यावेळी काळी मिरी आणि हळद ही पिकं काढू शकतात. केरळमध्ये आता भात कापणीची वेळ आली आहे. कोरडे हवामान पाहून शेतकरी भाताची कापणी करू शकतात.

तर महाराष्ट्रातील शेतकरी कापूस वेचू शकतात आणि परिपक्व लाल हरभरा काढू शकतात. याचबरोबर, मध्य प्रदेशात, गव्हातील रूट ऍफिड आणि स्टेम बोअररच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्सम 12.6% आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी 200 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोहरीवरील अल्टरनेरिया ब्लाइटच्या आक्रमणावर उपाय म्हणून आवर्तन पाणी द्यावे.