Weather Update | अवकाळीनंतर कसे आहे राज्यातील हवामान?


Weather Update | महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडताना दिसत असून राज्यात डिसेंबर २०२३ च्या सुरूवातीपासून राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढू लागला होता. दरम्यान, यातच डिसेंबरअखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीस अवकाळी पावसाचा अंदाज हावामान विभागाने वर्तवलेला होता. पश्चिमेच्या दिशेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत.

Weather Update
Weather Update

दरम्यान, मागील काही चार दिवसांपासून कोकण, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत आता अवकाळी पावसाने जरा विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. तर आजपासून राज्यात हवामानात बदल होणार असून पुढील ५ दिवस कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

दरम्यान, राज्यात आजपासून पावसाचे प्रमाण कमी होत हवेतील गारवा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 

Weather Update | पुढील दोन ते तीन दिवस तापमान हळूहळू घसरणार

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तापमान हळूहळू घसरणार असून त्यानंतर पुढील ३ दिवसात कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भात किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरणार असून इतर भागात फारसा बदल नसेल. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सुमारे १६.२ अंश तापमान नोंदवण्यात आले तर मालेगाव तालुक्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.