New Scheme | शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्यांवर अखेर तोडगा!


New Scheme | सध्या देशातील पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासल्याने शेतकरी नेहमीच चिंतेत असतो आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांबरोबरच राज्य तसेच केंद्र शासनही शेताला पाणी देण्याचे काम करावे लागते. या मालिकेत बिहार सरकारनेही शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सामूहिक कूपनलिका योजना सुरू केलेली आहे.

दरम्यान, बिहार असे राज्य आहे जिथे दरवर्षी अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांना पुराचा फटका बसत असतो. त्यामुळे बिहारमधील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांची पिके नासाडी झाली आहेत. त्याचबरोबर काही जिल्हे असे आहेत की जिथे नेहमीच पाण्याची टंचाई भासते. अशा परिस्थितीत बिहार सरकार राज्यातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामूहिक कूपनलिका उभारण्यासाठी बंपर अनुदान देत आहे.

New Scheme | शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार?

देशातील शेतकऱ्यांना सतत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातच सिंचनाच्या समस्येला तोंड देत असलेल्या बिहारमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा जाहीर केला असून या दिलासादायक निर्णयात शासनाने शेतकऱ्यांना कूपनलिका बसवण्यासाठी बंपर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजने अंतर्गत बिहार सरकार राज्यातील शेतात सामूहिक कूपनलिका बसवणाऱ्या शेतकऱ्यांना युनिट खर्चावर 80 टक्के सबसिडी देणार आहे. बिहारमधील शेतकऱ्यांचे गट तयार करून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

New Scheme | सामूहिक कूपनलिका योजना म्हणजे काय?

सामूहिक कूपनलिका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकत्रितपणे बोअरिंग केले जाते. या कूपनलिकेसाठी एका चेअरमन नेमले जात असून, त्याच्यावर बोअरिंगची जबाबदारी सोपवलेली आहे. त्याचबरोबर सामूहिक बोअरिंग करून शेतकरी वेळोवेळी आपल्या शेताला पाणी देऊन उत्पादन वाढवू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच खर्च कमी व्हावा या उद्देशाने सामूहिक कूपनलिका योजना शासनाने सुरू केली आहे.

New Scheme | कूपनलिका म्हणजे काय ?

हा विहीरीचा एक प्रकार असून यात यंत्राद्वारे जमिनीत पाणी शोधुन साठा करून तो बाहेर काढण्याकरिता वापर केला जातो. यामध्ये दाबायुक्त यंत्राच्या आणि पोलादाच्या पाईपांच्या साहाय्याने जमीनीत पाणीसाठा मिळेपर्यंत उत्खनन केले जाते. पाणीसाठा होण्याकरिता खडकामध्ये खोलीपर्यंत छिद्र केले जाते. छिद्राच्या तोंडावर लोखंडी किंवा पीव्हीसी पाईप टाकतात. त्यानंतर विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी बाहेर काढून वापरले जाते.