Agro News | ‘सरकारचा कांद्याचा भाव पाडण्याचा डाव’; स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधवांचा आरोप


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | “नाफेड” कडून बफर स्टॉक केलेला कांदा केंद्र सरकार बाजारात आणून कांद्याचे भाव पडणार असल्याची संताप जनक प्रतिक्रिया कसमादे पट्ट्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटू लागली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णायाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचा पोशिंदा सर्जा राजा देखील पुढे सरसावला असून, बैल पोळा सणा निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला सजवून त्यावर “नाफेड ने कांदा बाजारात आणू नये “एकच पक्ष, कांद्यावर लक्ष” असे रेखाटून एक प्रकारे सरकारच्या भूमिके विरोधात या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे.

Agro News | पीकांवर ‘पावडरी मिलड्यूक’ रोगाचे थैमान; कशी घ्याल काळजी

नाफेड कडून बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात आणला जाणार आहे. यासाठी वहातुक तसेच बारदाण पुरवठ्यासाठी तातडीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात अतिशय गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना, केंद्र सरकारने साखरे प्रमाणे लाखो टन खरेदी करून ठेवलेला रब्बी कांदा बाजारात आणुन भाव पाडण्याचा डाव आखला आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे.

Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले

Agro News | कांद्याचा भाव पाडण्याचा सरकारचा डाव

Agro News | कांद्याचा भाव पाडण्यासाठी सरकारचा डाव असून यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे तो थोडा फार समाधानकारक दर मिळत असताना केंद्राने चार महिन्यांपूर्वी खरेदी करून ठेवलेला कांदा खुल्या बाजारात आणुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असुन, नाफेडने घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा भावावर त्याचा विपरीत परिणाम होऊन दर खाली येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे लोकसभा निवडणूकीप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाहीत, असेही शेवटी कुबेर जाधव यांनी सांगितले. (Agro News)