Agro News | सरकारकडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 4,194 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. हे अर्थसाह्य येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात तांत्रिक अडचणी येत होत्या. ज्या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तातडीने सोडवण्यात आल्या.अर्थसाहाय्यात येणाऱ्या अडचणींवर तात्काळ तोडगाकापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत धनंजय मुंडे यांच्याद्वारे दूरदृष्टी प्रणालीतून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Agro News | ‘सरकारचा कांद्याचा भाव पाडण्याचा डाव’; स्वाभिमानीचे नेते कुबेर जाधवांचा आरोप
अर्थसाहाय्यात येणाऱ्या अडचणींवर तात्काळ तोडगा
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत धनंजय मुंडे यांच्याद्वारे दूरदृष्टी प्रणालीतून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Agro News | पीकांवर ‘पावडरी मिलड्यूक’ रोगाचे थैमान; कशी घ्याल काळजी
काय म्हणाले धनंजय मुंडे?
या आढावा बैठकीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये असे एकूण 4,164.68 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. वर्ष 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी हजार रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर 5000 रुपये अर्थ सहाय्य मंजूर झाले आहे. हे अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाद्वारे जाहीर केली गेली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचे घोषित केले असून येत्या 10 तारखेपासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. (Agro News)