Onion Export | एकदा यांचे उमेदवार पाडाच, तरच कांदा उत्पादकांची ताकद यांना कळेल


Onion Export | सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी रान पेटवले आहे. गेल्या पाच वर्षात अंदाजे चार ते पाच वेळा महाराष्ट्रात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांचे आता एकामागोमाग एक दौरे सुरू आहेत. दरम्यान, आज कोल्हापुरात महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुजरातमधील दोन मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली होती.

दरम्यान, चालून आलेली ही सुवर्णसंधी विरोधक कसे सोडतील..? त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यात विरोधक कमी पडले नाही आणि यामुळे एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. (Onion Export) दरम्यान, पंतप्रधान (PM Narendra Modi) आज महाराष्ट्रात येत असून, निवणुकांच्या तोंडावर त्यांना कोणत्याही विरोधाला सामोरे जावे लागू नये. याची खबरदारी म्हणून की काय मोदी महाराष्ट्रात लँड होण्याआधीच केंद्र सरकारने 99 हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली.

Onion Export | मोदींचे पाय महाराष्ट्रात पडण्याआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवली…

तसेच काही निर्बंध उठवत सहा मित्र देशांना निर्यात करण्यास आणि 2 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसही परवानगी दिली आहे. मात्र, आता या निर्णयाचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का..? तर, नाही कारण कांदा उत्पादक पट्ट्यातील जवळपास 70 ते 75 टक्के कांदा संपलेला आहे आणि यामुळे फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा केवळ निवडणूकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रकार असून, यात शेतकऱ्यांचा नाहीतर, व्यापऱ्यांचा फायदा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Onion Export | एकदा धडाधड त्यांचे उमेदवार पाडा…

जशा लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जवळ आल्या आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार पडणार हे त्यांना दिसायला लागले. त्यामुळे आता सरकार जागे झाले. आधी गुजरातमधील 2000 टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. त्यावर सगळीकडून टिका सुरू झाल्यानंतर आता 99 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली. याच आम्ही स्वागत करतो. मात्र, हा फार उशिरा घेतलेला निर्णय आहे आणि आता परवानगी द्यायचीच आहे.

तर, मग अटी कशाला घालता..? शेतकऱ्यांनी डोळे वटारल्यानंतर सरकार घाबरले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही केवळ डोळे वटारल्याने सरकार अवधे घबराट असेल. तर, एकदा धडाधड त्यांचे उमेदवार पाडा. त्याशिवाय हेच कुठलेही सरकार कांद्याकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करणार नाही आणि तरच कांदा उत्पादकांची ताकद सरकारला कळेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

यांना शेतकरी मेला तरी चालेल, पण…

दरम्यान, “आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घ्यायला हे सरकार इतके दिवस झोपलं होतं का..?. हा केंद्र सरकारला उशीरा सुचलेला शहाणपणा असून, काही विशिष्ट मतदारांचे लाड पुरवण्यासाठी सरकार हे अशा पद्धतीचे निर्णय घेत आहे. यांना शेतकरी मेला तरी चालेल. पण यांचा तो विशिष्ट मतदार टिकला पाहिजे. आता हा निर्णय घेऊन या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, असं रविकांत तुपकर म्हणाले.(Onion Export)