Wheat Price | कांद्यानंतर आता सरकार ‘या’ पीकाचे भाव पडणार..?


Wheat Price | सध्या देशात निवडणुकांचे वातावरण असून, सत्ताधारी पक्षांनी राज्यासह देशात प्रचाराचे रान उठवले आहे. आधीच विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्यावरून वेळोवेळी सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे महागाई वाढू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन सरकार विविध निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने स्थानिक बाजारात कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी लादली असून, यामुळे स्थानिक बाजारात कांद्याचे दर खाली आले आहेत. (Wheat Price)

दरम्यान, नागरिकांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी असलेले दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे गहू. त्यामुळे कांद्यानंतर आता सरकारने गव्हावर लक्ष्य केंद्रित केले असून, गव्हाचे दर खाली आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गव्हाच्या किंमतीत सध्या वाढ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात असून, सरकारचे गहू आणि तांदळाच्या साठ्यावर लक्ष आहे.

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

Wheat Price | नेमकं प्रकरण काय..?

केंद्र सरकारने गहू आणि तांदळाच्या साठवणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून, यानुसार १ एप्रिलपासून देशातील सर्व व्यापाऱ्यांना गव्हाच्या साठ्याचा अहवाल सरकारला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामागे शेतमालाची सुरक्षा आणि खरेदी विक्री दरम्यानची साठेबाजी रोखणे हा उद्देश्य असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील गव्हाच्या साठ्याची अंतिम मुदत ही आज संपणार असून, यानंतर https://evegoils.nic.in/rice/login.html या पोर्टलवर गव्हाच्या साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच यावेळी गव्हासोबत तांदळाच्याही साठ्याबाबत माहिती अपलोड करण्याबाबत सांगण्यात आले आहे. यानंतर आता सर्व वैधानिक संस्थांना वरील सरकारच्या पोर्टलवर त्यांचा गहू आणि तांदळाचा साठा नियमितपणे आपलोड करावा लागणार आहे.

Onion Export Ban | सरकार शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार; कांदा निर्यात बंदी कायम राहणार

सरकारचा इशारा

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग हे देशांतर्गत पीकांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू व तांदळाच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच शेतमालाच्या बाबतीत कुठलाही गैरव्यहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला असून, उद्यापासून रोज गहू आणि तांदळाची साठवण स्थिती ही सरकारपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे देशात किती साठा उपलब्ध आहे? याची माहिती सरकारकडे असणार आहे.(Wheat Price)