Weather News | मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान तयार; आज दक्षिण महाराष्ट्रात वादळीवाऱ्यांसह पावसाचा अंदाज


Weather News | परतीच्या पावसाचा रखडलेला प्रवासाचा सुरू होण्याची चिन्हे आहेत. यातच राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पाऊस उसंत घेणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच दक्षिण गुजरात मधील चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती निवळली असून उत्तर कोकणापासून आग्नेय उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. सोमवारी 30 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 35° सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी तापमान पुन्हा 32 अंशाच्या वर पोहोचले आहे.

Weather Update | मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

राज्यात या भागात आहे पावसाची शक्यता

तर आज कोकणातील सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नगर, पुणे, सातारा, बीड, धाराशिव, लातूरमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Weather News | चक्रीय वाऱ्यांमुळे आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर

परतीच्या पावसासाठी पोषक हवामान

सोमवारी दि. 23 सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. मंगळवारी राजस्थान व गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब,हरियाणाच्या काही भागातून मॉन्सून परतला. परंतु फिरोजपुर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबु, सुरेंद्रनगर ते जुनागड पर्यंत मॉन्सूनची प्रतीची सीमा कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान पंजाब हरियाणाच्या आणखी काही भागांसह जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान असणार आहे. तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या भागांना वादळी वारा आणि विधानसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather News)