Ajit Pawar | लोकसभेला दिलेल्या झटक्याने पार कंबर मोडली; माफी मागत कांदा उत्पादकांना दादांचा वादा

Ajit Pawar

नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. विशेषत: कांदा पट्ट्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कांदा निर्यात बंदी, अतिरिक्त कांदा निर्यात शुल्क, कांदा उत्पादकांच्या (Onion Farmers) बाबतीतील धरसोडीचे धोरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच नाराज होते आणि त्यांची आपली नाराजी लोकसभा निवडणुकीत मतपेटीत दाखवून दिली. याची कबुली महायुतीचे पराभूत उमेदवार, देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Bangladesh Onion Export | ३२ तासानंतर भारत-बांग्लादेश सीमेवर अडकलेले कांद्याचे ट्रक रवाना

Bangladesh Onion Export

Bangladesh Onion Export | गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू असून, यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा देत देशातून पळ काढत भारतात आश्रय घेतला आहे. दरम्यान, यानंतर भारताने बांगलादेशसह आपल्या इतर सीमाही सील केल्याने भारतातून बांगलादेशात होणारी मालाची निर्यात (Export of Agricultural Produce) ही थांबवण्यात आली होती. त्यामुळे भारत-बांग्लादेश सीमेवर निर्यातीसाठी जाणाऱ्या कांद्यांचे शेकडो ट्रक … Read more

Nashik Rain | देवळा तालुक्यात जोरदार पाऊस; गिरणा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला

Nashik Rain

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यात कालपासून सर्वदूर जोरदार पाऊस बरसत असून या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली व रात्री पावसाचा जोर वाढला. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने गिरणा नदी दूधडी भरून वाहत असून, नदीला पूर आल्याने नदीलगत … Read more

Nashik Rain | नाशकात पावसाची जोर’धार’; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

Nashik Rain

Nashik Rain | नाशिक :  महाराष्ट्रात काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार, कालपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, धरणांच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर, गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी दूधडी भरून वाहत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, यामुळे दिंडोरी तालुक्यातील वाघाड, तिसगाव, … Read more

Ajit Pawar |  ‘…तर पवारांची औलाद नाही’ म्हणत शेतकऱ्यांना ‘दादांचा वादा’

Ajit Pawar

नाशिक :  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कळवण सुरगाणाचे (Kalwan Surgana) आमदार नितीन पवार यांच्या मतदार संघात विकासकामांच्या उद्घाटन आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांची डायलॉगबाजी पहायला मिळाली. लोकसभेला नाशिकमध्ये शेतकरी प्रश्नाचा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अजित पवारांनी कालची सभा गाजवली. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, हा गड … Read more

Corn Import | विनाशुल्क मका आयातीला राजू शेट्टींचा कडाडून विरोध; यामुळे शेतकरी संकटात सापडतील

Corn Import

वैभव पगार – प्रतिनिधी – दिंडोरी | केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांनी आयात शुल्क न लावता आपल्या देशात मका आयात करण्यास परवानगी द्यावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. सदरची मागणी चुकीची असून येत्या महिन्याभरात खरीप हंगामातील मका बाजारात येणार आहे. यामुळे हा निर्णय झाला तर मका उत्पादक शेतकरी संकटात सापडतील. याकरिता सदरचा … Read more

Igatpuri | दिलासादायक पावसामुळे बळीराजा सुखावला; इगतपुरीत भात लावणीला सुरुवात

Igatpuri

इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून टाकेद परीसरात आतापर्यंत 375.70 मी मी (सरासरी 25%) पावसाची नोंद झाली आहे. या परीसरात 60 ते 65% भातलागवड पूर्ण झाली असून सध्या भातलागवडीसाठी बळीराजाला मजुरांची कमतरता जाणवत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जून व जुलैचा पंधरवाडा हा पावसाअभावीच गेला होता. भाताची रोपं शेतकऱ्यांनी … Read more

Deola | शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे देवळ्यात लाक्षणिक उपोषण

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुका काँग्रेस पक्षातर्फे शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) रोजी देवळा पाच कंदील येथे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाचा आशय असा की, देशात कोणीही उपाशीपोटी झोपू … Read more

Deola | इटलीच्या शेती अभ्यासकांची देवळ्यातील शेतकऱ्याच्या डाळींब बागेला भेट

Deola

देवळा : तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथे मंगळवारी (दि.२३) रोजी इटलीच्या शेती अभ्यासक कॅरोला यांनी जगदीश शिंदे यांच्या डाळींब बागेला भेट देऊन फळबाग लागवड शेतीची माहिती जाणून घेतली. अमेरिका विद्यापीठातर्फे आलेल्या या इटलीच्या शेती अभ्यासक शिष्टमंडळाने (दि.२३) रोजी महाराष्ट्रातील काही मोजक्या तीन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. यात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा … Read more

Nashik News | नाशिककरांना दिलासा..! धरणांचा पाणीसाठा वाढला; पुढील दोन दिवस रेड अलर्ट

Nashik Rain

नाशिक :  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. धरणांनी तळ गाठल्याने नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धारणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात व घाट परिसरात मागील दोन … Read more