Flipkart Big Year-End Sale उद्यापासून होणार सुरु; आयफोन-TV वर तुफान ऑफर्स


Flipkart Big Year-End Sale | फ्लिपकार्टचा वर्षातील शेवटचा फ्लिपकार्ट (Flipkart Big Year-End Sale) बिग इयर एंड सेल 2023 लवकरच सुरू होणार असून 9  डिसेंबरपासून सुरू होणारा हा सेल 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळू शकणार आहे. फ्लिपकार्टने सेलची तारीख जाहीर केली असून यावर्षी तुम्हाला काही उत्पादनांवर 50 ते 80 टक्के सूट मिळू शकते.

या सेलमध्ये अनेक बँक कार्डवर त्वरित सूट देणार असून या ऑफरअंतर्गत ग्राहकांना आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डचा वापर करून 10% इंस्टंट डिस्काउंट मिळू शकेल. याशिवाय फ्लिपकार्ट Axis Bank Credit Card वापरणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.(Flipkart Big Year-End Sale)

‘Kia Sonet Facelift SUV’ 14 डिसेंबरला लॉन्च होणार; अवघ्या 25 हजारांत करा बुकिंग

Mobile offers

फ्लिपकार्ट बिग इयर एंड सेलमध्ये सर्वांच्या नजरा आयफोन्सवर असणार आणि म्हणुन यावेळी आयफोन 14 वर जोरदार सूट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय सॅमसंग, वनप्लस, विवो, ओप्पो सारख्या फोनवरही मोठी सूट मिळू शकणार आहे.

Laptos Offers 

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉपवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून ही सवलत सर्व प्रमुख लॅपटॉप ब्रँड्सना लागू असेल. त्यामुळे जर तुमचं बजेट असेल आणि चांगला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका.

Smartwatch offers

हेडफोन आणि स्मार्टवॉच हा मोठा सेगमेंट आहे ज्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून ही सवलत सर्व प्रमुख हेडफोन ब्रँड्सना लागू असणार आहे.

TV Offers 

सेलमधून तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळत आहेत. थॉमसन टीव्ही सेलमध्ये 5,999 रुपयात उपलब्ध आहे. कंपनी 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजमध्ये टीव्ही देखील ऑफर देत आहे. त्यामुळे तुमचा जर टीव्ही घ्यायचा विचार असेल आणि तुम्ही चांगल्या ऑफर्सची वाट बघत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे असं समजा. (Flipkart Big Year-End Sale)