Exam Update | SSC-HSC परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खासगी विद्यार्थ्यांना मुदतवाढ


Exam Update | महाराष्ट्रात आता लवकरच परिक्षांचा काळ सुरू होणार असून दहावी-बारावीच्या परिक्षांसंदर्भात एक नविन अपडेट समोर आलेली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (HSC) फॉर्म नंबर १७ भरून दहावी तसेच बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासहीत (overdue) अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. (Exam Update)

Health Tips | सावधान! सतत बसून काम करताय? मग स्मृतिभ्रंश होण्याचा धोका

दहावी-बारावी परिक्षा ह्या सर्व विद्यार्थांसाठी फार महत्तवाचा टप्पा मानला जातो. आता याच परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक महत्तवाची माहीती समोर आलेली असून खासगी विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही, असे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘http://form17.mh-ssc.ac.in’ आणि बारावीकरिता ‘http://form17.mh-hsc.ac.in’ ही संकेतस्थळ उपलब्ध केली आहेत. हे अर्ज भरण्यासाठीच्या सूचना या संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजीमधून उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. (Exam Update)

Onion Export | कांदा निर्यातीवर निर्बंध; गेल्या 10 वर्षांत तब्बल 21 वेळा सरकारचा हस्तक्षेप

नियमित विद्यार्थी वगळता खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब (overdue) शुल्काने नावनोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 20 डिसेंबर 2023 असणार आहे. त्या कालावधीनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे प्रभारी सचिव बांगर यांनी जाहीर केलेलं आहे. (Exam Update)