कोणीही तुमचं चॅट वाचू नये तर मग WhatsApp मध्ये करा ‘ही’ सेटिंग


WhatsApp | इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणजेच WhatsApp चे देशात कोट्यवधी युजर्स आहेत. हे भारतात सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप देखील मानलं जातं. Android, iPhone किंवा डेस्कटॉप अशा प्रत्येक डिव्हाइसवर ह्याचा वापर केला जातोआणि त्यामुळे Meta नं आपल्या ह्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक सिक्योरिटी फीचर्स जोडले आहेत जे तुमच्या अकाऊंटसह तुमचा संवाद देखील सुरक्षित ठेवतात. ह्या प्लॅटफॉर्मसाठी कंपनी सतत नवीन फीचर्स देखील आणत असते.

ह्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर युजर्स खाजगी चॅटिंग देखील करत असतात म्हणुन असे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं नवीन Screen Lock फीचर लाँच केलेला असून ह्या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खाजगी चॅट्स सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया Android, iOS आणि डेस्कटॉपवर हे फीचर कसं वापरायचं?

Onion News | कांदा निर्यातबंदीवरून विधानसभेत विरोधकांचा राज्य सरकारला सवाल

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक- Android

  1. चॅट लॉक करण्यासाठी सर्वात पहिले WhatsApp ओपन करा आणि सेटिंग्स मध्ये जा.
  2. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर टॅप करा आणि बॉटमला फिंगरप्रिंट लॉक सिलेक्ट करा.
  3. त्यानंतर Unlock With Fingerprint ऑप्शन ऑन करा.
  4. Verificationसाठी तुमच्या फोनच्या फिंगरप्रिंट सेन्सरवर टॅप करा किंवा तुमचा फेस स्कॅन करा.
  5. मग तुम्हाला फिगरप्रिंट ऑथेंटिकेशनसाठी टाइम सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळणार असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार सेट करू शकता.
  6. चॅट अनलॉक करण्यासाठी वरील स्टेप को फॉलो करा आणि Unlock With Fingerprint ऑप्शन ऑफ करा. अशाप्रकारे तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट अनलॉक होईल.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक- iOS

  1. चॅट लॉक करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp लाँच करा आणि सेटिंग्स मध्ये जा.
  2. त्यानंतर प्रायव्हसी यावर टॅप करून स्क्रीन लॉक सिलेक्ट करा.
  3. तिथे तुम्हाला Require Touch ID किंवा Face ID चा ऑप्शन मिळेल, तो ऑन करा.
  4. WhatsApp चॅट अनलॉक करण्यासाठी वरील स्टेप फॉलो करा आणि Require Touch ID किंवा Face ID चा ऑप्शन ऑफ करायचे आहे.

Tech News | हॅकिंगचा कहर वाढला! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक – डेस्कटॉप/वेब वर

  1. सर्वप्रथम WhatsApp Web मध्ये जा आणि चॅट लिस्टमध्ये सेटिंग्समध्ये जा आणि त्यानंतर प्रायव्हसीवर क्लिक करा.
  2. त्यानंतर स्क्रीन लॉकवर क्लिक करून, स्क्रीन लॉक सिलेक्ट करा.
  3. त्यानंतर तुमच्या आवडीचा मजबूत पासवर्ड ठेवा.
  4. मग Ok वर क्लिक करा आणि चॅट लॉक करा.
  5. चॅट अनलॉक करण्यासाठी वरील स्टेप्स फॉलो करा आणि स्क्रीन लॉक ऑप्शन डिसेलेक्ट करा आणि पासवर्ड टाकून WhatsApp वरील चॅट्स अनलॉक करता येतील.