यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसतो आहे. यापूर्वी दुष्काळ त्यानंतर बरसलेला अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांना अगदी मेटाकुटीला आणल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडले असून यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण त्याबरोबरच मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतलेला आहे. (Shetkari Bhavan)
राज्यात कृषि उत्पन्न समित्यांची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम 1963 आणि नियम 1967 अन्वये झालेली असून राज्यात 306 सहकारी बाजार समित्या आणि या मुख्य बाजारसमितींच्या 623 उपबाजार समित्या आहेत. यातच या बाजारसमितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. (Shetkari Bhavan)
दरम्यान शेतकरी भवन उभारण्याच्या ह्या निर्णयामुळे राज्यातील ११६ बाजार समित्यांमध्ये जिथे शेतकरी भवन नाही, अशा बाजार समित्यांसाठी आता प्रत्येकी १.५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. दरम्यान, यासाठी पणन विभागाकडून ५० ते ७०टाक्यांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या ह्या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हक्काचा निवारा यामुळे उपलब्ध होणार आहे.(Shetkari Bhavan)
आधुनिक शेती करण्यावर केंद्र व राज्य शासन हे सध्या भर देत असून, सरकारने सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बाजार समितीमधील निवाऱ्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यामधील शेतकरी भवन नसणाऱ्या बाजार समित्यांत शेतमालाच्या विक्रीसाठी दुरहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी साध्या सोयी सुविधादेखील उपलब्ध नसल्याने अनेक दूरच्या गावांहून बाजार समित्यांमध्ये शेतमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होत नसून, शेतकऱ्यांना उघड्यावर रात्र काढावी लागते आहे. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता राज्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उभारण्याचा हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
दरम्यान, यासाठी शेतकरी भवनाचे मॉडेलदेखील ठरवण्यात आलेले आहे. दरम्यान, यात तळ मजल्यावर बहुउद्देशीय हॉल, तीन शॉप, तर पहिल्या मजल्यावर प्रत्येकी चार रूम, तसेच एकूण २० बेड असलेली ही इमारत बाजार समित्यांमध्ये उभारण्यात येणार आहे. तसेच ह्या प्रत्येक शेतकरी भवनासाठी १.५२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ३० ते ५० टक्के खर्च हा बाजार समितीलाहि करावा लागणार आहे. तसेच उर्वरित निधी हा राज्य सरकार देईल. (Shetkari Bhavan)
तसेच, सद्यस्थितीत राज्यभरातील १९० बाजार समित्यांत शेतकरी भवन असून, ज्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन आहेत. अशा भवनांचीही दुरुस्तीदेखील ह्या मंजूर करण्यात आलेल्या निधीतून करता येणार आहे. जे शेतकरी भवन जुने झाले आहेत. त्यांची पणन मंडळाच्या समितीमधील वास्तु विशारदांकडून ह्या जुन्या शेतकरी भवनाची पाहणी करून ते दुरुस्तीस आलेले असल्यास ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेतून नवीन शेतकरी भवन बांधण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहेत.