Rain Update | राज्यात आज पावसाची विश्रांती


Rain Update | राज्यभरामध्ये सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर आता ओसरला असून उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण वगळता उर्वरित भागांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची चिन्ह आहे. आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Weather News | चक्रीय वाऱ्यांमुळे आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर

ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार

उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे आज कमाल तापमानात चढ-उतार होत असून शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांक 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर आज राज्यामध्ये मुख्यतः पाऊस विश्रांती घेणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वाशिम, नागपूर जिल्ह्यातील तूरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला असून सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड; आज पावसाचा जोर ओसरणार

परतीच्या पावसाची वाटचाल मंदावली

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 23 तारखेपासूनच वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर मंगळवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मॉन्सून परतला असून त्यानंतर मात्र मॉन्सूनची परतीची वाटचाल थबकली आहे. फिरोजपुर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू्, दिसा, सुरेंद्रनगर ते जुनागड पर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा कायम आहे तर आज वाशीम आणि नागपूरला वादळी वारा आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.