Rain Update | शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार


Rain Update | सध्या महाराष्ट्रात थंडीने कहर केला असून देशातील अनेक भागात तापमानातील पारा घसरत आहे. वाढत्या थंडीमुळे राज्यासह देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याने आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन कृषी तज्ञांकडून करण्यात येत आहे. यातच, हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे शेती उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होत असून सध्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, राज्यातील हवामानासंर्दभात एक मोठी अपडेट येत असून राज्यातील काही भागात आता अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातही थंडीचा जोर वाढत असून आता महाराष्ट्रातील विदर्भातील काही भगात येत्या दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच आधी वाढती थंडी आणि आता अवकाळी यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Rain Update
Rain Update

Rain Update | महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

सध्या देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वारे वाहत असून यातच महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामागील कारण म्हणजे वायव्य अरबी समुद्र आणि महासागराच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रातील काही भागात हे चक्राकार वारे पसरत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.  

अचानक वाढलेली थंडी यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरीकदेखील त्रस्त आहे. अचानक अवकाळी बरसण्यामागील कारण म्हणजे एका अहवालानुसार, मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे असणार आहे.

Rain Update | येत्या दोन दिवसात सरासरीएवढा पाऊस बरसण्याची शक्यता

तसेच, प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, मराठवाडयात येत्या दोन दिवसात सरासरीएवढा पाऊस (Rain Update) बरसण्याची शक्यता असून मराठवाड्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 26 जानेवारी नंतर पुढील काही दिवस सरासरीएवढा पाऊस होण्याची शक्यता आहे. आता या काळात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.