PM Kisan Yojana | भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग म्हणजे कृषी क्षेत्र असून सध्या भारतासह महाराष्ट्रात शेती आधुनिकिकरण तसेच शेतीला तांत्रज्ञानाची जोड देण्याकडे राज्य तसेच केंद्र सरकार भर देत असल्याचं चित्र आहे. यासाठी देशासह राज्यात अनेक योजना राबवल्या जातात. यातच या नविन वर्षात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
देशातील अल्प आणि अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेचा 16 वा हफ्ता केंद्र सरकार लवकरच देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
पंतप्रधान किसान योजनेचा १५ वा हफ्ता नोव्हेंबर २०२३ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आणि यावेळी देशभरातील 8 कोटींहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा निधी जमा करण्यात आला होता. यानंतर नववर्षात पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हफ्ता केव्हा वर्ग केला जाणार याची प्रतिक्षा देशासह राज्यातील शेतकऱ्यांना होती. आता या संहर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
PM Kisan Yojana | १६ वा हप्ता या तारखेला वर्ग केला जाणार ?
भारतात कृषी क्षेत्राला अनन्यासाधारण महत्त्व असून भारतात पारंपारिक शेतीसह सध्या आधुनिक शेतीकडे देशाची वाटचाल सुरू आहे. यातच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या ठराविक उत्पन्नासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हफ्यांद्वारे निधी वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत असताना पुढील हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया अहवालानुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील १६ वा हप्ता फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो.