Fake Scheme | शेतकऱ्यांनो ‘या’ योजनेचा लाभ हवाय तर जरा सांभाळून!


Fake Scheme | भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय असून केंद्र तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच आर्थिक पाठबळ मिळेल हा हेतू ठेवून या योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र या योजना राबवत असतानाच काही बनावट योजनांची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. मात्र त्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी कालावधी लागतो. याच दरम्यान, इंटरनेटवर काही योजनांची बनावट माहीती देत शेतकऱ्यांना फसवले जाते. अशाच पद्धतीने सध्या एका चर्चित योजनेबाबत शेतकऱ्यांना फसवलं जात असल्याची माहीती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी भारतात एक योजना जाहीर करण्यात आली होती. ती योजना म्हणजे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 50 टक्के सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचंदेखील या वेबसाईट्सवर सांगितलं जात आहे.

या बनावट वेबसाईटवर या योजनेची माहितीही देण्यात येत आहे. दरम्यान, सध्या इंटरनेटवर पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची बनावट वेबसाईट असून ज्यावर असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 50 टक्के सबसिडी दिली जाणार आहे असा दावा या वेबसाईटवर करण्यात येत आहे.

Fake Scheme | पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना

पीआयबी फॅक्ट चेक ही भारत सरकारशी संबंधित खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीची सत्यता पडताळत असते. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेकमध्ये या योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून या रिपोर्टनुसार, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नसून पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

मात्र, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेची ही वेबसाईट तसेच ही योजना भारत सरकारकडून राबवण्यात येत नसल्याचं वृत्त समोर आलं असून पीएम किसान ट्रॅक्टर योजना एक बनावट योजना आहे. केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना प्रत्यक्षात राबवण्यात येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.