Onion Export Ban | नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी हा प्रश्न हा पेटलेला असताना संपुर्ण नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी कांदा निर्यातबंदी या विषयावर आवाज उठवला मात्र हे सगळं पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालं आहे. आधी दुष्काळी परिस्थिती त्यानंतर अवकाळी आणि गोरपिटीने कांदा उत्पादकांना जगणं अवघड केलेलं असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर घणाघात घातला. आता हा निर्णय मागे घ्यावा अशी सातत्त्याने मागणी करून देखील सरकार जाणूनबुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
दरम्यान, यंदा नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना अनेक अडचणींना सामेरे जावे लागले असून या कांदा निर्यातबंदीचा परिणाम शेतकऱ्यांच्या वैयक्तिक आयूष्यावर देखील होताना दिसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते यातच कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरचे विवाह सोहळेदेखील कांद्यामुळे रखडले आहेत. सध्या सगळीकडे लगनसराईची धामधूम असून या हंगामात मिळणाऱ्या पैशांमुळे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या घरातील लग्न जमवत असतात. मात्र एका नामांकित वृत्तवाहिनीने दिलेल्या माहीतीनुसार, यंदा कांद्याला भाव नसल्यामुळे तसेच आर्थिक टंचाईमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातील विवाह तसेच इतर शुभकार्यावर विघ्न आलेले आहे.
Onion Export Ban | दुहेरी विंवचनेत जिल्ह्यातील शेतकरी अडकला!
7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदी केला आणि त्यानंतर कांद्याचे बाजार भाव सातत्याने घसरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकंटाला सामोरे जावे लागत असून परिवाराचा उदरनिर्वाह आणि घरातील शूभकार्य अशा दुहेरी विंवचनेत जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे. यामुळे केंद्र सरकारने आतातरी निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
कांद्याचे लिलाव आज सुरळीत सुरु
केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाला विरोध करण्यासाठी नाशिकमधील शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत 8 जानेवारीपासून सर्व शेतकरी हे संपावर जातील असा निर्णय घेण्यात आला हेता. मात्र या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजेच लासलगाव बाजारसमितीसह नाशिक जिल्ह्यातील सर्वांच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आज सुरळीत सुरु आहेत.