Nashik Rain | नाशकात परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी


Nashik Rain | नाशिक मधील चांदवड येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच दणादण झाली असून शेती पिकांचं नुकसान झालंय. यामध्ये प्रामुख्याने नुकतीच लागवड केलेली कांद्याची लागवड त्याचबरोबर लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या रोपांचे अतोनात नुकसान झाले आहे या पिकांसोबतच मका आणि बाजरी या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Weather Update | राज्यात आज पावसाचा यलो अर्लट

मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

काल मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव चांदवड सटाणा इत्यादी ग्रामीण भागामध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कांदा पिका कांदा पिकाबरोबरच काढणीस आलेल्या मका पिकाचे ही नुकसान झाले असून, शेतकरी फार चिंतेत आहेत त्यामुळे सरकारने झालेल्या नुकसानाची दखल घेत योगा तातडीने मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Nashik Rain)