Agro News | परतीच्या पावसाने खरीप पिकाच्या काढणीत अडथळा


Agro News | मागील दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांच्या काढणीला ब्रेक लागला असून शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस वेळेत सुरू झाला असून खरिपाची पेरणी 94% झाली आहे. पेरणीनंतरही जून ते ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली आहेत. परंतु मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून निधी जाहीर; पहा कोणाला मिळणार लाभ…

पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळे खरिपातील मूग, भईमूग, उडीद या पिकांसह अन्य पिकांच्या काढणीला सुरुवात झाली होती. तसेच शिराळा तालुक्यात आगाव भात पिकाची पेरणी झालेल्या भाताच्या काढणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले होते. तर मुग, उडीद, भुईमूग या पिकांची 30 ते 40 टक्के काढणे पूर्ण झाली होती. याचदरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावली. या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढणीला आता ब्रेक लागला आहे.

द्राक्ष छाटणीतही अडथळा

तर ऑगस्टमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी फळ छाटणी करत असतात परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे द्राक्ष वेलींची पाने गळाली आहेत. पावसामुळे आगाप छाटणी देखील झालेली नसून द्राक्ष छाटणी तर करावीच लागणार आहे. परंतु, आता छाटणी केल्यास पावसामुळे वाया जाण्याची भीती आहे. तर आता या छाटण्या ऑक्टोबरमध्ये एकाच वेळी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दुष्काळी भागात रब्बीच्या पेरणीचे नियोजन

तर दुष्काळी भागात खरीपाची काढणी बऱ्यापैकी पूर्ण झाली असून रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी पिकाची पेरणी केली जाते. परंतु पाऊस झाल्यानंतरच शेतकरी ज्वारी पिकाच्या पेरणीचे नियोजन करतात. त्यामुळे जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात चांगला पाऊस झाला असल्याने आता रब्बीच्या पेरणीचे नियोजन पुढील आठ दिवसात होण्याची शक्यता आहे. (Weather News)