Weather Update | पोषक हवामान तयार झाल्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. आज सोमवार दिनांक 23 रोजी राज्य पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम मध्ये बंगालचा उपसागर तसेच, म्यानमारच्या दक्षिण किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मान्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, गुना, सागर, बिलासपूर, चांदवली ते पूर्व मध्य बंगालचे उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे या दोन्ही स्थितींच्या प्रभावामुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात 23 तारखेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले होते.
Weather News | आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट
पुढील तीन-चार दिवस पाऊस कायम राहणार
याच पार्श्वभूमीवर राज्यात आता पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाण हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. पावसाची दडी असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका वाढला असून रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अमरावती, ब्रह्मपुरी येथे राज्यात उच्चांक ही 35.6°c तापमानाची नोंद झाली. तर अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे देखील तापमानात चांगलीच वाढ होती. तसेच आज राज्यात पावसाचा जोर वाढवून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे व उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पावसाचा जोर पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून दर्शविण्यात आली आहे.
Weather Update | अखेर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागणार
जोरदार पावसाच्या शक्यतने यलो अर्लट
परतीच्या पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पावसाचे पुनरागमन होणार असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया या भागांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.