Monsoon | महाराष्ट्रात कधी जोरदार पाऊस; बघा काय सांगताय हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे


माणिकराव खुळेहवामानशास्त्रज्ञ | संपूर्ण देशात मान्सूनने जोर धरला असून मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर आणि अरबी समुद्रातील  पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा वगळता पुढील पाच दिवस १० जुलैपर्यंत एमजेओ(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) व मान्सुनच्या तटीय अशा दोन्ही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Monsoon | नाशिक जिल्ह्यात कुठे कसा पाऊस

गेल्या १० दिवसापासून हलका होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे. परंतु  ७ जुलैपासुन ह्या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असून, इतर प्रणाल्यातून या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात उद्यापासून पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.(Monsoon)

Monsoon Tracker | उत्तर महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार

महाराष्ट्रात जोरदार पाऊस कधी..?

महाराष्ट्रात सध्या २७ जूनपासून मध्यम स्वरूपात पाऊस होत असून, अजूनही काही जिल्ह्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. तर, उतार आलेल्या पिकाबाबत जिरायत शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण असले. तरी देशाच्या मध्यावर स्थापित झालेला मुख्य मान्सूनी आस त्याच्या सरासरी जागेपासून जोपर्यंत अधिक दक्षिणेला सरकत नाही. तोपर्यंत जोरदार पाऊसासाठी वाट पहावी लगणार आहे. दरम्यान, ही शक्यता या जुलै महिन्यात घडू शकते.(Monsoon)

Maharashtra Monsoon Updates | ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार